जळगाव जिल्ह्यात आढळले नवे ९११ रुग्ण

    दिनांक : 05-Sep-2020
Total Views |
जळगावात २४० रुग्णांची भर, ५१८ कोरोनामुक्त
 
corona_1  H x W
 
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून शनिवारी तब्बल ९११ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. त्यात सर्वाधिक २४० रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३२ हजारवर गेली आहे. दिवसभरात ८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शनिवारी जिल्ह्यात ५१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
 
नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव ग्रामीण ४१, भुसावळ ५४, चोपडा ८२, पाचोरा ४४, भडगाव १०, धरणगाव ८, यावल १३, एरंडोल ६९, जामनेर ६४, रावेर ५४, पारोळा ४३, चाळीसगाव ६५, मुक्ताईनगर ५, बोदवड १० व इतर जिल्ह्यातील ९ रूग्णांचा समावेश आहे.
 
दरम्यान, जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ३२ हजार ६६० इतकी झाली असून त्यापैकी २२ हजार ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात शनिवारी ८ जणांचा उपचारादम्यान मृत्यू झाला असून त्यात जळगाव शहरातील तीन, एरंडोल तालुक्यातील दोन तर जामनेर, यावल व भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृताची संख्या ८५७ इतकी झाली असून सध्या ८ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात आज ५१८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आजवर या विषाणूला हरविणार्या रूग्णांचा आकडा २२ हजार ३६३ वर गेला आहे. तर आज दिवसभरात ०८ मृत्यू झाले असून आजवरच्या मृतांची संख्या८५७ इतकी झाली आहे.