एरंडोल नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदीयोगेश देवरे यांची बिनविरोध निवड

    दिनांक : 28-Sep-2020
Total Views |
 
erandol_1  H x
एरंडोल, २८ सप्टेंबर
येथील नगरपालिकेच्या उपाध्यक्ष जयश्री नरेंद्र पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २८ सप्टेंबर रोजी विशेष सभा पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांच्या अध्यक्षतेखाली होऊन उपाध्यक्षपदी योगेश देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
 
योगेश देवरे यांच्या एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. नगराध्यक्ष रमेश परदेशी हे त्यांना सूचक होते. अनुमोदन शेख जहिरोद्दीन कासम होते. सभेला २१ नगरपालिका सदस्य उपस्थित होते. दोन सदस्य गैरहजर होते. निवड झाल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी शाल व पुष्पहार देऊन योगेश देवरे यांचे स्वागत व सत्कार केला.
 
 यावेळी मुख्याधिकारी किरण देशमुख कार्यालय अधीक्षक संजय धुमाळ, नगरसेवक अभिजीत पाटील, डॉ. सुरेश पाटील, नितीन चौधरी, प्रा.मनोज पाटील, ऍड. नितीन महाजन, कुणाल महाजन, डॉ. नरेंद्र ठाकूर, तसेच नगरसेविका वर्षा शिंदे, छाया दाभाडे, मोमीन अब्दुल शकूर, अ.लतिफ बानोबी गुलाब बागवान, असलम पिंजारी, आरती महाजन, प्रतिभा पाटील, दर्शना ठाकूर, हर्षाली महाजन आदी उपस्थित होते.