कारागृहात सीमकार्ड पोहचविण्यासाठी मदत करणार्‍यास अटक

    दिनांक : 24-Sep-2020
Total Views |
जळगाव ; कारागृहात सिमकार्ड पाहिजे मागणी करताच संशयित आरोपींच्या मित्रांनी नवीन सिमकार्ड खरेदी केले. हे सिमकार्ड पावडरच्या डब्यात टाकून ते कारागृहापर्यंत पोहचविण्यासाठी आपली मोटारसायकल देणार्‍या संशयित आरोपी सागर उर्फ कमलाकर सुभाष पाटील(२४) रा. तांबापुरा, अमळनेर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
 
 
 

sagar Patil_1   
 
 
कारागृहरक्षकाला पिस्तुलचा धाक दाखवून सुशिल मगरे, सागर पाटील व गौरव पाटील हे तीघ जिल्हा कारागृहातून फरार झाल्याची घटना २५ जुलै रोजी घडली होती. हा संपुर्ण घटनेचा मास्टर माईंड सुशिल मगरे हा असून त्यांना पळून जाण्यासाठी जगदीश पाटील, अमित चौधरी, नागेश पिंगळे, करण पावरा यांनी वेळोवेळी मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. तसेच सिमकार्डबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कसून चौकशी करण्यात आली.
 
 
सागरला सुचली सिमकार्ड पोहविण याची युक्ती
पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या नागेश पिंगळे याने आपल्या नावावर नवीन सिमकार्ड खरेदी केले होते. परंतु हे सिमकार्ड कारागृहात कसे पोहचवायचे असा प्रश्‍न असल्याने सागर उर्फ कमलाकर पाटील याने पावडरच्या डब्यात टाकून ते कारागृहातील गौरवपर्यंत पोहचविण्याची युक्ती सुचली. त्यानंतर सागरने नागेशला आपली मोटारसायकल (एमएच १९ डीएन ४२५८) ने कारागृहापर्यंत पोहचविण्यास सांगितल्याचे तपासात समोर आले आहे.
 
 
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने केली अटक
कारागृहातून पळून गेलेले संशयीत आरोपी ज्या मोबाईलवरुन त्यांनी संवाद साधला. त्याबाबत अधिक तपास करण्याच्यासुचना नूतन पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, दीपक शिंदे, प्रविण हिवराळे, विजय पाटील, दत्तात्र्य बडगुजर, नरेंद्र वारुळे, किरण चौधरी यांचे पथक तयार करुन तपासकामी रवाना केले होते.
 
 
मुख्य सूत्रधार अद्याप फरारच
कारागृहातून पयालन केलेला मास्टरमाइंड सुशिल मगरे हा अद्याप फरार आहे. कारागृहातून पळून गेलेले गौरव व सागर यांना पोलिसांनी अटक केली. मात्र सुशिल मगरे अद्याप फरार असल्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.