कोरोनामुळे जिल्ह्यात सोमवारी १८ जणांचा मृत्यू

    दिनांक : 21-Sep-2020
Total Views |
जिल्ह्यात ४७५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर, ६२५ कोरोनामुक्त
 

dfnk_1  H x W:  
 
जळगाव : कोरोनामुळे रुग्णांची मृत्यू संख्या कमी होत नसून सोमवारीही जिल्ह्यात उपचारादरम्यान १८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा संख्या ही बरे होणार्‍या रुग्णांपेक्षा कमी आहे. दिवसभरात जिल्ह्यात ४७५ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून ६२५ रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे.
 
सोमवारी नवीन आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जळगाव शहर १११, जळगाव ग्रामीण १५, भुसावळ ४३, अमळनेर ४५, चोपडा ३९, पाचोरा ७, भडगाव ४, धरणगाव २२, यावल २०, एरंडोल १०, जामनेर १८, रावेर ४५, पारोळा २०, चाळीसगाव ५३, मुक्ताईनगर २२, बोदवड ७ व इतर जिल्ह्यांमधील ४ असे एकूण ४७५ रूग्ण आहेत.
 
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४४ हजार ३७२ इतका आहे. त्यातील ३३ हजार ५६६ रूग्ण बरे झाले आहेत. तसेच सोमवारी दिवसभरात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरातील ६, भुसावळ तालुक्यातील ४, एरंडोल तालुक्यातील ३, चोपडा, जामनेर, रावेर, जळगाव, यावल तालुक्यातील प्रत्येका एका रुग्णंाचा समावेश आहे. तर आतापर्यंत १११४ जणांचा उपचारामुळे मृत्यू झाला आहे. सध्या सध्या ९ हजार ६९२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण यांनी दिली.