आठ लाख चाळीस हजारांची बॅगबोदवड स्टेट बँकेतून केली लंपास

17 Sep 2020 21:06:43

bodvad_1  H x W
चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद;
पोलिसांकडून तपासाला गती
तभा वृत्तसेवा
बोदवड, १७ सप्टेंबर
शहरातील मुक्ताईनगर रस्त्यावरील स्टेट बँकेत गुरुवार १७ रोजी साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास अमर डेअरीचे मालक अमर खत्री यांच्या डेअरीचा भरणा करण्यासाठी त्यांचा ड्रायव्हर उमेश रमेश महाजन (वय ४०) बँकेत भरणा करण्यासाठी गेला असता दोन बॅगेमध्ये ९ लाख रुपये आणले होते. त्यातील एका बॅगेत ८ लाख ४० हजार रुपये तर दुसर्‍या बॅगेत ७० हजार रुपयाची चिल्लर नोटांची रक्कम होती. कॅशिअरकडे भरणा करत असताना ७० हजार रुपयांची चिल्लर रक्कम बँक कॅशिअरला मोजून देत असतांना जवळच खाली ठेवलेली दुसरी बॅग निळ्या रंगाचा शर्ट घातलेला अंदाजे १८ ते वीस वर्षाच्या चोरट्याने चोरून नेली.
 
चोरटा ८ लाख ४० हजार रुपये घेऊन चोरटा पसार झाला. चोरट्याचे कारनामे सीसीटीव्हीत आढळून आले. चोरी मागील काळात पण झाली होती. खंडेलवाल पेट्रोल पपंचे मॅनेजर स्टेट बँकमध्ये भरणा करण्यासाठी आला असता त्याची पैश्यानी भरलेली बॅग घेऊन अज्ञान चोरट्याने लंपास केली होती. पोलिसांनी त्या गुन्ह्याचा तपास सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे लवकरात लवकर लावला होता.
 
आजच्या परिस्थितीत कोरोना महामारी असल्यामुळे चोरट्याच्या तोंडावर मास्क लावले असल्यामुळे तसेच सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये चोरट्याचा चेहरा स्पस्टपणे दिसत नसल्याने पोलीस प्रशासनासमोर चोरट्याला जोरबंद करणे मोठे आव्हान आहे. चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलिसांनी याप्रकरणी तपासला वेग देण्याची मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0