शिरपूर तालुक्यात कोरोना रोखण्यासाठीचाळीसगावचे डॉ. कपिल पाटील यांचा लढा

    दिनांक : 12-Sep-2020
Total Views |

shirpur _1  H x
कोरोना योद्धा डॉ. पाटील करताहेत
उपचारासह रुग्णांचे समुपदेशन
तभा वृत्तसेवा
शिरपूर, १२ सप्टेंबर
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला आहे. कोरोनाचा चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर रुग्णांमध्ये मोठी भिती निर्माण होते. परिणामी रुग्ण दगावतात. मात्र चाळीसगाव तालुक्याचे सुपुत्र कोरोना योध्दा डॉ.कपील पाटील रूग्णांचा उपचाराबरोबर समुपदेशन करीत आहे. त्यामुळे रुग्णांची भिती कमी होत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेत त्यांची उपचार पध्दती व रुग्णाला धीर देण्याच्या संकल्पनेने नागरीकांमध्ये त्यांची आरोग्य विभागातील देवदूत म्हणून तालुक्याचत चर्चा आहे. शिरपुर तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी त्यांचा अविरत लढा सुरू आहे. रुग्णांची भिती घालवण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधून सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे कार्य डॉ.पाटील करीत आहेत. रुग्णांचे मनोबल वाढविण्यावर त्यांची भर दिला आहे.
 
 
कोरोना योद्धा डॉ.कपील पाटील आजही जीवाची पर्वा न करता मोठा लढा देत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. डॉ. पाटील शिरपूर तालुक्यात रुग्णांसाठी खर्‍या अर्थाने देवदूत म्हणून काम करीत आहे. शिरपूर तालुक्यातील प्रत्येक खेड्यात करोनाची लागण झालेले रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे शिरपुर उपजिल्हा रुग्णालयात दररोज कोरोनाची तपासणी करणार्‍या रुग्णांची संख्या आता शेकडोवर गेली असताना रुग्णालयातील डॉक्टर देखील कोरोना बाधित होत आहेत. आजस्थितीत देखील शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आलेल्या रुग्णांची संख्या दिडशेच्यावर आहे.
 
कोरोेनाची भीती निर्माण झालेल्या रुग्णांचे मनोबल वाढविण्याच्या कामात रुग्णालयातील कोरोना योध्दे डॉ. कपिल पाटील यांचे योगदान मोठे आहे. कोरोना झालेल्या रुग्णाला ते अत्यंत गोड भाषेत, काव्यातून संभाषण करून कोरोना झालेलाच नाही असे प्रथमतः दर्शवितात. रुग्णाच्या मनातील भीती दूर करून हसवून मनमोकळ्या गप्पा त्यांच्याशी करून कोरोनाच्या भितीने ग्रासलेल्या व्यक्तिला मानसिक आधार देत त्याचे मनोबल वाढवितात. एखाद्या व्यक्तिला जर उपचाराबाबत काही शंका असल्यास त्याच्या शंकेचे निरसनही डॉ.कपिल पाटील करीत आहेत. कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मक मानसिक बदल घडवून आणण्याचे त्यांचे प्रयत्न विशेष उल्लेखनिय आहे.
 
नागरिकांनी कोरोना विषाणूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच गर्दीची ठिकाणे नागरिकांनी आवर्जून टाळावी. लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करून उपचार घ्यावे.
  -  डॉ.कपिल पाटील, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर