जिल्ह्यातील ७८१ ग्रा.पं.वरप्रशासकांची नियुक्ती

    दिनांक : 11-Sep-2020
Total Views |
 
jalgoan _1  H x
 
जळगाव : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ७८१ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी तालुकानिहाय ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून शासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यातील प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या पुढीलप्रमाणे अमळनेर ६७, भडगाव ३३, भुसावळ २६, बोदवड २९, चाळीसगाव ७६, चोपडा ५२, धरणगाव ४७, एरंडोल ३७, जळगाव ४३, जामनेर ७३, मुक्तासॅनगर ५१, पाचोरा ९६ ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली. कोविडच्या पार्श्‍वभुमीवर आपत्तीजन्य स्थितीत निवडणूक घेणे शक्य नसल्याने जिल्हाभरातील ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे.