सुरक्षा रक्षकाकडून पोलीस कर्मचार्‍यास मारहाण

    दिनांक : 10-Sep-2020
Total Views |
जळगाव:
Crime _1  H x W
 
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील पिंप्राळा वाटीकाश्रम येथील रहिवासी असलेला पोलीस कर्मचारी दीपक रमेश राव (३२) हे पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस आहे. त्याच्या वडीलांना न्युमोनिया असल्याने त्यांना ४ सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 
 
विनंती करुन देखील सोडले जात नाही
आपल्या वडीलांची प्रकृती खालावती असतांना देखील सुरक्षा रक्षकांकडून नातेवाईकांना रुग्णास भेटू दिले जात नाही. तसेच पोलीस कर्मचार्‍याने वारंवार विनंती करुन देखील सुरक्षा रक्षकांकडून दीपक राव यांना आत सोडण्यात येत नसल्याची तक्रारदाराने तक्रारीत नमुद केले आहे.
 
 
हुज्जत घालून केली मारहाण
दीपक राव यांच्या वडीलांना जागेवरुन हालता येत नसल्याने त्यांचा जेवणाचा डबा घेवून दीपक हे आपल्या भावासह आले होते. वडीलांना जेवण देखील करता येत नसल्याचे सांगत त्यांनी आत जाण्यास सुरक्षा रक्षकांकडे विनंती केली. परंतु सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याशी हुज्जत घालीत त्यांच्यासोबत धक्काबुक्की करीत त्यांना मारहाण केली.
 
 
बाहेरच्यांना बोलावून घेण्यापर्यंत वाढील मुजोरी
दीपक यांनी आपण पोलीस कर्मचारी असल्याचे देखील त्या सुरक्षा रक्षकांना सांगितले. यावेळी हुज्जत घालणार्‍या वैभव एकनाथ माळी याने अन्य सुरक्षा रक्षकांना बोलविले. त्यांनी बाहेरील अन्य काही जणांना फोन लावून बोलावून घेत दीपक राव यांना बाजूला नेत मारहाण केली.
 
 
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलीस कर्मचारी दीपक राव यांना मारहाण झाल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक वैभव एकनाथ माळी, गौतम बगळे, करण जावळे, योगेश गोयल, मयुर महाजन या पाच जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भटू नेरकर करीत आहे.