कोरोनामुळे जिल्ह्यात १९ रूग्णांचा मृत्यू

    दिनांक : 10-Sep-2020
Total Views |
जिल्ह्यात नव्याने आढळले १०९८ रुग्ण, ७१८ रुग्णांची कोरोनावर मात

dfnk_1  H x W:
 
 
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्यासही प्रचंड वाढली आहे.जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात कोरोनामूळे १९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल ५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशानाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
 
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील बाधितांचा आकडा प्रचंड वेगाने वाढू लागला आहे. गुरुवारी दिवसभरात कोरोनाच्या १०९८ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आजपर्यंतचा बाधितांचा आकडा हा ३६ हजार ४४० इतका झाला आहे. तर दुसरीकडे समाधानाची बाब म्हणजे दिवसभरात ७१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सर्वाधिक बरे झालेले रुग्ण अमळनेर आणि चाळीसगाव तालुक्यातील आहेत.
 
असे झाले मृत्यू
कोरोनामुळे गुरुवारी दिवसभरात १९ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहर ४, पाचोरा तालुका ४, धरगणाव ३, भुसावळ २,चोपडा २, भडगाव, जामनेर, एरंडोल, यावल तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.
 
आतापर्यंत ९३३ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात कोरोनामुळे सुमारे १९ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही नऊशे पार गेली आहे. मंगळवारी १७, बुधवारी २० तर गुरुवारी १९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
असे आढळले रुग्ण
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ३७०, जळगाव ग्रामीण ५१, भुसावळ १४, अमळनेर १०६, चोपडा ९७, पाचोरा ४६, भडगाव ११, धरणगाव ५१ , यावल २३, एरंडोल ३९, जामनेर १२, रावेर ७१, पारोळा १८, चाळीसगाव ७२, मुक्ताईनगर २९, बोदवड १४, इतर जिल्ह्यातील १४ अशी रूग्ण संख्या आहे.