जामुनजिरा येथे सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार

    दिनांक : 09-Aug-2020
Total Views |

yawal_1  H x W: 
यावल : तालुक्यातील सातपुडा डोंगर भागातील एका सहावर्षीय आदिवासी मुलीवर वीस वर्षीय आदिवासी तरुणाने आमिष दाखवून लैगिक अत्याचार केल्याची घटना जागतिक आदिवासी दिनाच्या एक दिवस आगोदर दुपारी ३ वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील जामुनजिरा येथे घडली. याबाबत रात्री उशिरा यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
याबाबत सविस्तर माहीती अशी की, सहा वर्षीय आदिवासी बालिकेच्या आईने यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, आरोपी रोहन बिलासिंग पावरा वय २० रा.जामुनझिरा ता. यावल याने ८ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास माझ्या मुलीस मला व तिच्या वडिलांना न विचारता केळी खायला देण्याचे आमिष दाखवून केळीचे शेतात घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला. घडलेली घटना मुलीने घरी आल्यावर सांगितली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत यावल पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहाय्यक निरिक्षक सुनिता कोळपकर करीत आहेत.