राजकारणाची नाही माणसाला वाचविण्याची वेळ

    दिनांक : 09-Aug-2020
Total Views |

chalisgoan _1  
 
चाळीसाव येथे लोकसहभागातून उभाण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या
उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
चाळीसगाव : कोरोना हा आजार काही जात, पात, पक्ष, धर्म पाहून येत नाही. त्यामुळे आज जो जगेल तो उद्या राज्य करेल. चाळीसगाव हे दात्यांचे गाव आहे. चांगल्या कामात लोकसहभाग आला तर त्याची उंची देखील वाढते. कोरोना विरोधातील लढाईसाठी आ. मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने व सर्वपक्षीय लोकसहभागातून उद्घाटन झालेले कोविड केअर सेंटर कौतुकास्पद असून ही वेळ राजकारणाची नसून माणसाला वाचविण्याची आहे. त्यामुळे कोविड व त्या अनुषंगाने असलेल्या कामांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
ते चाळीसगाव येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर चाळीसगाव तालुक्याचे आ. मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, माजी आ. ईश्वर जाधव, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे, तहसिलदार अमोल्र मोरे, वैद्यकीय डॉ.बी.पी.बाविस्कर, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शिवसेना तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, उमंग परिवाराच्या संपदा पाटील. सा बां.उपअभियंता नवनाथ सोनवणे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
 यावेळी कोविड केअर सेंटरविषयी माहिती देताना आ. मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, महिन्याभरापूर्वी चाळीसगाव तालुक्यात वाढणार्‍या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता लोकसहभागातून कोविड सेंटर सुरु व्हावे यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात अनेक पक्ष संघटनानी पुढे येत मदत जाहीर केली. चाळीसगाव तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्याठिकाणी शब्द दिला की ज्या ज्या ठिकाणी कमतरता भासेल त्याठिकाणी मी उभा राहील आणि आज दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचा आनंद असून चाळीसगावातील अनेक दात्यांच्या मदतीने राज्यातील सुसज्ज असे कोविड सेन्टर येथे लोकसहभागातून उभारले गेले आहे. खाजगी रुग्णालयापेक्षाही चांगल्या दर्जाचे कोविड सेंटर उभारले गेल्याने मी चाळीसगावातील सर्व दात्यांचे मनापासून आभार मानतो अशी भावना आ. चव्हाण यांनी व्यक्त केली.
ग्रामीण रुग्णालय उभारणीबाबत आलेल्या अडचणी सांगताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अपूर्ण होते. कोरोना मुळे निधीला अडचण येणार होती. त्याबाबत सबंधित ठेकेदारांना मी व खासदार महोदयांनी विश्वास दिला की आज आणीबाणीची परिस्थिती आहे. तुम्ही काम पूर्ण करा, आम्ही पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देऊ. त्यांनीदेखील पदरमोड करत हे पुण्याचे काम आहे म्हणत अल्प कालावधीत खाजगी रुग्णालयाला लाजवेल अशी इमारत उभी केली. अंदाजपत्रकाच्या व्यतिरिक्त त्यांनी डांबरी रस्ते एवजी सर्व रस्ते सिमेंट चे बनविले, वाल कंपाऊंड, दुसर्‍या मजल्यासाठी टावर, गटारी बांधकाम केल्या. तसेच अंदाजपत्रकात आतील भिंतीला ३ फुटापर्यंतच फरची (टाइल्स) होती ती वाढवून ६ फुटापर्यंत करण्यात आली त्यामुळे भिंती स्वच्छ करणे सोयीचे होणार आहे. याबरोबरच अंदाजपत्रकातील साध्या पीओपी ऐवजी निर्जंतुकीकरणासाठी जॉइंटलेस पीओपी आदी ५० लाखांची अतिरिक्त कामे करून दिली. प्रास्ताविक डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी केले. ग्रामीण रुग्णालय इमारतीचे ठेकदार विवेक पानसरे, तालुक्यातील कोविड रुग्णांचे मानसिक सामोपदेशन करणारे रणजीत गव्हाळे यांचा सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
या केविड क;अर सेंटरमध्ये ५० बेडसाठी ऑक्सिजन यंत्रणा, १ वाशिंग मशीन, ६ एलईडी स्मार्ट टीव्ही, म्युझिक सिस्टम,
५० बेड, ५०० बेडशीट सर्व खिडक्यांना पडदे, संपूर्ण परिसर व बाथरूमला मॅट, ४८ सीसीटीव्ही कॅमेरे, १० बाथरूमसाठी सोलर वाटर हिटर सिस्टम, वाशिंग मशीन एअरटेल डीश टीव्ही ५, ३ हायमास्ट लाईट, ५० बकेट, २५ मग, १ सफाई मशीन, तसेच आमदार निधीतून - ३० लाखांची अत्याधुनिक रुग्णवाहिका व ५ लाखांची ऑटोलाईन, जी.एम.फाउंडेशन (गिरीषभाऊ महाजन) २ व्हेंटीलेटर आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.