जिल्ह्यात आढळले नवे ४५६ कोरोनाबाधित रूग्ण

    दिनांक : 09-Aug-2020
Total Views |
अमळनेर तालुक्यात ९६ रुग्णांचा समावेश, २८५ रुग्ण कोरोनामुक्त

corona_1  H x W 
 
जळगाव, ९ ऑगस्ट
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून रविवारी तब्बल ४५६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात २८५ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
 
जिल्ह्यामध्ये ४५६ कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक ९६ रूग्ण हे अमळनेर तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल जळगाव शहरात ७७ आणि चोपडा तालुक्यात ५६ रूग्ण संख्या वाढली आहे. तर जळगाव ग्रामीण १४, भुसावळ १५, पाचोरा ३३, भडगाव १३, धरणगाव २७, यावल ४, एरंडोल १८, जामनेर ३१, रावेर १८, पारोळा २४, चाळीसगाव. ९, मुक्ताईनगर १३, बोदवड ६ आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकूण ४५६ रूग्ण आढळून आले आहे.
 
अशी आहे एकूण आकडेवारी
जळगाव शहर ३,५४३, जळगाव ग्रामीण ७०६, भुसावळ १,०३२, अमळनेर १,०५५, चोपडा १,०६७, पाचोरा ५८८, भडगाव ६२६, धरणगाव ६५८, यावल ५२७, एरंडोल ७४८, जामनेर १,०१५, रावेर ७७८, पारोळा ५९०, चाळीसगाव ६५०, मुक्ताईनगर ४३८, बोदवड २६३, इतर जिल्हे ५९ असे एकूण १४ हजार ३४३ रूग्णांची संख्या झाली आहे.
 
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ३४३ इतकी झाली आहे. त्यातील ९ हजार ८७३ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यात रविवारी २८५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरात ७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात मृतांचा आकडा ६०८ झाला आहे. जिल्ह्यात ३ हजार ८६२ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.