जिल्ह्यात आढळले ३१३ नवीन कोरोनाबाधित

08 Aug 2020 20:06:01
दिवसभरात २४४ रूग्णांची कोरोनावर मात

corona_1  H x W 
जळगाव : जिल्ह्यात शनिवारी ३१३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यात बाधितांची संख्या १४ हजाराच्या उबंरठ्यावर पोहचली आहे. दिवसभरात २४४ रूग्णांनी कोरोनावर मात केली. जळगाव शहरासह अमळनेर, चोपडा, भडगा, जामनेर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याचे दिसून आले.
 
जिल्ह्यात आढळेल्या ३१३ कोरोनाबाधित रूग्णांमध्ये सर्वाधिक ६८ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. तर अमळनेरमध्ये ५३ तर चोपडा, जामनेर आणि भडगाव तालुक्यात प्रत्येकी २६ रूग्णांचा समावेश आहे. तर जळगाव ग्रामीण १२, भुसावळ १४, पाचोरा ३, धरणगाव १२, यावल १४, रावेर २१, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर १२, बोदवड १ आणि अन्य जिल्हा ५ अशा नव्या रुग्णांचा समावेश आहे.
 
तालुकानिहाय एकूण आकडेवारी
जळगाव शहर ३, ४६६, जळगाव ग्रामीण ६९२, भुसावळ १, ०१७, अमळनेर ९५९, चोपडा १, ०११, पाचोरा ५५५, भडगाव ६१३, धरणगाव ६३१, यावल ५२३, एरंडोल ७३०, जामनेर ९८४, रावेर ७६०, पारोळा ५६६, चाळीसगाव ६४१, मुक्ताईनगर ४२५, बोदवड २५७, इतर जिल्हे ५७ असे एकूण १३ हजार ८८७ रूग्णांची संख्या झाली आहे.
 
दरम्यान, शनिवारच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही १३ हजार ८८७ इतकी झाली आहे. त्यातील ९ हजार ५८८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभररात २४४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच दिवसभरात ९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादम्यान मृत्यू झाला. त्यात जळगाव, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी एक तर चोपडा व भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ६०१ रूग्णांचा मृत्यू झाला असून ३ हजार ६९८ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0