किनगाव, डांभूर्णी, चिंचोली शिवाराततालुका कृषी अधिकार्‍यांकडून पीक पाहणी

07 Aug 2020 21:15:33
 

dabhurani_1  H
 
 
डांभुर्णी ता.यावल, ७ ऑगस्ट
डांभुर्णीसह परीसरात शेती शिवारात शेतकर्‍यांनी पेरलेल्या कापुस, मका, सोयाबीन, उडीद, मुंग,ज्वारी या पिकांची शेतावर शेतकर्‍यांच्या भेटी घेत पिक पाहणी करुन पिकांवर असलेल्या आजारांबाबत व रोगांवरील नियंत्रणाबाबत चर्चा करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.
 
सध्याच्या काळात पाऊस कमी असल्याने पीकासाठी कशी उपाययोजना करता येईल व कमी पाण्यात जास्त उत्पन्नाकडे वळता येऊ शकते. या विषयांवर अचुक मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी आर.एन.जाधव यांनी केले. तसेच वातावरणातील बदलामुळे यावर्षी कापूस व मका या पीकांवर लष्करी अळी व बोंडअळीचा प्रभाव कमी असल्याने यावर फवारणी करुन तिच्यावर नियंत्रण येऊ शकते अशी माहीती शेतकर्‍यांना देण्यात
आली.
याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी खैरनार, कृषी पर्यवेक्षक एम.डी.पाटील, कृषी सहाय्यक विलास बारी, हितेंद्र चौधरी, राजेंद्र निकम, शेतकरी तनोज पाटील, राजेंद्र फालक, किशोर भंगाळे, ताराचंद फालक, पुंडलिक लढे, दिनेश सपकाळे, नितीन बडगुजर ,धनराज माणिक हिवराळे, तुकाराम धनगर, जगदीश किरंगे, अशा आनेक शेतकर्‍यांची उपस्थिती होती. शेती शिवारात शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन त्यांच्या पिकांवरील रोगाबाबत व पिकांची पाहणी करुन सखोल अभ्यासक मार्गदर्शन केल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.
 
Powered By Sangraha 9.0