केमिस्ट असो.चे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या कार्याचे खा.उन्मेश पाटील यांच्याकडून कौतुक

07 Aug 2020 20:54:44

bhangale_1  H x 
 
जळगाव : कोरोना महामारीने देशात उग्र रूप धारण केलेले असताना जगातील सर्वच व्यापार बंद होते. अशावेळी जिवाची पर्वा न करता औषधांची गरज असणार्‍या रुग्णांची काळजी घेत केमिस्ट संघटनेचा प्रत्येक सभासद औषधाचा पुरवठा करीत आहे. या कार्याबद्दल केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांचे खा.उन्मेश पाटील यांनी कौतुक करुन अभिनंदन केले.
 
कोरोनाच्या काळात कोरोना विषाणूच्या उपचारास उपयुक्त असलेले इन्जेक्शन/ औषधे हे फक्त कोविड-१९ हॉस्पिटलमध्येच मिळत होते. बाहेरील गरजूंना ती औषधी मिळत नव्हती. अशा स्थितीत जिल्हा केमिस्ट असो.चे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून औषधी सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देत एक अनमोल काम केले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे हाल थांबले आणि वेळीच औषधी मिळाल्याने अनेकांचे प्राणही वाचले आहेत. ही धडपड लक्षात घेता खा.उन्मेश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.
 
जिल्ह्यातील कुठल्याही रुग्णास औषधांची गरज असेल तेव्हा जळगाव जिल्हा केमिस्ट असो.चे अध्यक्ष, पदाधिकारी असो वा सभासद यांनी २४ तास सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. कोविड महामारीच्या या कठिण प्रसंगात औषध उपलब्ध करुन देण्याची धडपड अतिशय उल्लेखनीय आहे. केमिस्ट संघटनेने केलेल्या कामाबद्दल त्यांचे कौतुक करुन अशीच सेवा त्यांनी यापुढे देत राहावे. रुग्णांची सेवा करत असताना त्यांनी स्वतःचीही काळजी घ्यावी, अशी अपेक्षाही खा.उन्मेश पाटील यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
 
सुनिल भंगाळे मध्यरात्री आले धावून
शहरातील गोल्ड सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ वडील दाखल होते. मध्यरात्री त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पाहिजे असलेले इन्जेक्शन शहरात कुठेही उपलब्ध नव्हते. त्यावेळी जिल्हा केमिस्ट असो.चे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्याशी संपर्क साधला. इन्जेक्शनबाबत कुठेलीही विचारणा न करता त्यांनी तत्काळ मध्यरात्रीच ते उपलब्ध करुन दिले. वेळेवर इन्जेक्शन मिळाल्याने वडिलांच्या स्थितीत सुधारणा होऊ लागली आहे. अशाचप्रकारे सुनील भंगाळे इतरांची सुद्धा मदत करीत असून त्याबद्दल त्यांना शुभेच्छा.
- देवेंद्र साळी, (एरंडोल, ह.मु.दिल्ली/मुंबई)
Powered By Sangraha 9.0