जिल्ह्यात आढळले ४८७ नवे कोरोनाबाधित

    दिनांक : 07-Aug-2020
Total Views |
 
corona_1  H x W
 
जळगाव, ७ ऑगस्ट
जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल ४८७ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या १३ हजार ५७४ इतकी झाली आहे. सर्वाधिक ९९ कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात १९९ बाधित रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी गेले आहेत.
 
जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरुच आहे. शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळून आले असून कोरोनाने चारशेचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी नव्याने ४८७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
 
नव्याने आढळलेले रुग्ण असे
नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ९९, जळगाव ग्रामीण ३१, भुसावळ २३, अमळनेर ३२, चोपडा ४५, पाचोरा ८, भडगाव ४३, धरणगाव १७, यावल ९, एरंडोल ७९, जामनेर २८, रावेर ६, पारोळा ३४, चाळीसगाव २६, बोदवड ४ इतर जिल्ह्यातील ३ जणांचा समावेश आहे.
 
आठ जणांचा मृत्यू
दिवसभरात ८ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, यावल, रावेर, पारोळा व चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.