वयाच्या 95 व्या वर्षी अयोध्येत

    दिनांक : 06-Aug-2020
Total Views |

 
श्रीरामांची मूर्ती घडवताहेत मराठमोळे हात
 
 
‘रामायण’ हे भारतीय संस्कृतीतील महाकाव्य. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली ही रामकथा शतकानुशतके लोकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श राजा, उत्तम योध्दा, एकपत्नी, एकवचनी, एकबाणी असलेला राम हा खरोखरच एक आदर्श मानव होता.
ईक्ष्वाकू कुळात अयोध्या नगरीत दशरथ आणि कौसल्येच्या पोटी जन्मलेला राम आजही तमाम हिंदूंचे मोठे श्रद्धास्थान आहे.
 
RAM SUTAR _1  H
 
 
भारतीय इतिहासातील अनेक धर्मीय सम्राटांनी केलेल्या लढाया,आणि स्वार्‍यांनी जी धर्मस्थानं नेस्तनाबूत केली त्यात अयोध्येतील रामलल्लाचं जन्मस्थानही सुटलं नव्हतं. अखेर 5 ऑगस्ट, रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्मितीचा शिलान्यास झाला. त्यावेळी अयोध्या दिवाळीसारखी सजली.
 
 
यातील सर्वात महत्त्वाचे होते ते प्रभू रामचंद्र यांची मूर्ती घडविण्याचे काम!!! ते केलेय प्रख्यात शिल्पकार आणि कलावंत राम सुतार यांनी. प्रत्येक शिल्पकाराला आपल्या आराध्य दैवतांची मूर्ती घडवायला मिळणं हे किती मोठं काम वाटत असतं. कारण या कामामुळे त्या मूर्तीकाराचं नांव अजरामर होत असतं. याचा प्रत्यय त्यांना या मूर्तीने नक्कीच मिळाला असेल.
 
 
प्रभू रामचंद्रांची अयोध्येत जी मूर्ती घडवली जाणार आहे तिचे काम ज्येष्ठ मूर्तिकार राम सुतार करतायत. 251 फूट उंचीची प्रभू रामचंद्र यांची मूर्ती बनवणं हे मोठं आव्हान आहे आणि ते या ज्येष्ठ मूर्तिकारांनी लीलया पेललेय.
 
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार ही मूर्ती बनवण्याची जबाबदारी राम त्यांना सोपवली गेलीय.
 
 
असे आहेत राम सुतार
 
 
राम सुतार हे नोएडा येथील रहिवासी ज्येष्ठ मूर्तिकार असून त्यांना आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांना पद्मपुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकासाठी उभारलेला 183 मीटर उंचीचा पुतळाही त्यांनीच तयार केलाय. प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीच्या घडणावळीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मूर्ती पूर्णपणे स्वदेशी असेल. मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या राम सुतार यांनी आजवर 15000 मूर्ती तयार केल्या आहेत.
 
 
त्यांचा जन्म महाराष्ट्रातील धुळे येथे 19 फेब्रुवारी 1925 रोजी झाला. लहान वयातच त्यांनी मूर्ती बनवायवा सुरुवात केली होती. मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी कलेचं शिक्षण घेतल. कांस्य, दगड आणि संगमरवरी मूर्ती बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी पुरातत्व खात्यातही काम केले आहे. अजंठा-वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे आणि इतर मूर्तींना मूळ रुपात आणण्याचे कठीण काम त्यांनी केलं आहे. गंगासागर धरणावरील चंबळ देवीची मूर्ती त्यांचीच आहे.
 
 
त्यांनी बनवलेला गांधीजींचा पुतळाही खूप प्रसिद्ध झाला. भारत सरकारनं रशिया, फ्रान्स, बार्बाडोस, अर्जेंटिना या आणि इतरही कितीतरी देशांत ती मूर्ती गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भेट म्हणून दिली होती.
 
 
प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची वैशिष्ट्यं
 
* ही मूर्ती पूर्णपणे स्वदेशी असेल.
* या मूर्तीचा व्यास 20 मीटरचा राहील. त्याचबरोबर ही मूर्ती 50 मीटर पायावर उभी असेल.
* येथे एक मोठं संग्रहालय असेल. त्यात विष्णूचे दशावतार असतील. जे डिजीटल पद्धतीने दाखवले जातील. त्याचबरोबर फूड प्लाझा, रामाची माहिती देणारी गॅलरी आणि डिजिटल म्युझियमसुध्दा असेल.