आयोध्येला जाणार्‍या कारसेवकांचा पहूरवासीयांकडून सत्कार

    दिनांक : 05-Aug-2020
Total Views |
 
pahur _1  H x W
 
 
पहूर ता.जामनेर : आयोध्या येथे १९९० व १९९२ मध्ये प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थानी कारसेवेसाठी जाऊन आलेल्या कारसेवकांचा आयोध्येत होत असलेल्या श्रीरामलल्लांच्या अभूतपूर्व मंदीर भुमिपूजन सोहळ्याचे औचित्य साधून पहूरवासीयांतर्फे सत्कार करण्यात आला.
 
सुमारे पाचशे वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर अयोध्या नगरीत श्रीराम जन्मभूमी मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे .अयोध्या नगरीत जावून कारसेवेत सहभागी झालेले पहूर येथील बाबुराव घोंगडे , माधव जानराव पाटील , शंकर रामदास घोगडे , माधव तुकाराम जाधव , जगन तात्या सोनवणे , दिनकर शालीग्राम घोंगडे, रतन शिवराम क्षीरसागर, संजय काशिनाथ जाधव , अंबादास पंढरीनाथ रोकडे , सुखदेव हरी घोंगडे , भारूडखेडा येथील मंगलसिंग बाबुराव राजपूत, परशुराम शिवाजी काळे, सुभाष हरी तांदळे, हरिसिंग उत्तमसिंग राजपूत आदी कारसेवकांचा भगवे वस्त्र, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भारत माता महिला पतसंस्थेचे तज्ञ सल्लागार मधुकर पवार यांनी प्रास्ताविक केले.
 
 यावेळी माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे, जगन सोनवणे यांनी आपले अनुभव सांगितले. म्हणाले की , आम्ही भाग्यवान असल्याने आम्हाला कारसेवेत सहभागी होता आले. घरावर तुळशीपत्र ठेवून आमच्यासारखे लाखो रामभक्त अयोध्येत दाखल झाले होते आणि त्यांच्याच प्रयत्नातून आज प्रभू श्री रामचंद्र मंदिराचा भूमिपूजन सोहळा होत आहे. हा संपूर्ण जगभरातील तमाम हिंदू बांधवांसाठी आणि कार सेवकांसाठी आनंदाचा सोहळा आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच योगेश भडांगे होते. यावेळी केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी उपक्रमाची भूमिका मांडली.
 
सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, किशोर बनकर, सुनील उबाळे, हरीभाऊ राऊत,भगवान जाधव, युनुस तडवी, राजेंद्र सोनवणे, अमोल बावस्कर, प्रकाश जोशी ,राजेंद्र चौधरी, मनोज खोडपे, दिपक पाटील, तुकाराम जाधव ,रवींद्र पाचोने, सुधाकर राऊत, प्रकाश घोंगडे, नितीन लहासे, दिलीप पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले.