पाचोरा पं.स.सदस्य ललीत वाघयांच्यावर गुन्हा दाखल

    दिनांक : 05-Aug-2020
Total Views |
 
pachora _1  H x
 
नांद्रा आरोग्य केंद्राचे डॉ. ज्ञानेश्वर सय्यासे यांना मारहाणप्रकरण भोवले
पाचोरा : तालुक्यातील नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालय येथे १ ऑगस्ट रोजी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास फिर्यादी डॉ.ज्ञानेश्वर रमेश सय्यासे कर्त्यव्यावर हजर असतांना पंचायत समिती सदस्य ललित राजेंद्र वाघ (रा.बांबरुड राणीचे) याने दारूच्या नशेत अरेरावी केली.तसेच शिवीगाळ दमदाटी करून चप्पलने मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करून नुकसान केले. लाईव्ह शूटिंग करून ती शेअर करून माझी बदनामी केल्याची फिर्याद डॉ.ज्ञानेश्वर सय्यासे यांनी पाचोरा पोलिसात बुधवारी दाखल केली.
 
याप्रकरणी पाचोरा पंचायत समितीचे सदस्य ललित राजेंद्र वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे व पोलीस कॉ. योगेश पाटील करत आहे.