तीन वर्षात होणार राम मंदिराचे काम पूर्ण

    दिनांक : 05-Aug-2020
Total Views |
 
२ वर्ष आठ महिन्यात होणार राममंदिराचं काम पूर्ण 
अयोध्या : भूमीपूजनाचा सोहळा तर होईलच मात्र राममंदिराचं काम कधी पूर्ण होईल, याची उत्सुकता आता भक्तांना लागली आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी श्री राम जन्मभूमि तीर्थ ट्रस्टचे ट्रस्टी स्वामी परमानंद महाराज यांच्याशी संवाद साधला. यावेळी स्वामी परमानंद महाराज यांनी सांगितलं की, लवकरात लवकर मंदिराचं निर्माण पूर्ण केलं जाईल. भूमीपूजनानंतर लगेचच मंदिर निर्माणाचं काम सुरु होईल. ट्रस्टकडून मंदिर निर्माण करणाऱ्या कंपनीला मंदिराचं पूर्ण निर्माण करण्यासाठी पुढच्या 32 महिन्यांना वेळ दिला आहे. म्हणजे 2 वर्ष आणि आठ महिन्यात मंदिराचं निर्माण पूर्ण होऊ शकतं. परमानंद महाराज म्हणाले की, देशात ज्या ज्या ठिकाणी शिला पूजन केलं आहे. त्या सर्व शिलांचा वापर राम मंदिर निर्माणासाठी केला जाणार आहे.
 

Ayodhya_Modi_1  
 
 
गणेश पूजन संपन्न
प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाच्या कार्यक्रमाला कालपासून सुरुवात झाली आहे. काल सकाळी या मंदिराच्या ठिकाणी गणेश पूजन पार पाडलं. सकाळी 9 वाजता सुरु झालेलं हे पूजन दुपारी 1 वाजता संपन्न झालं. हिंदू धर्मात कुठल्याही शुभकार्यााआधी गणेशाची पूजा केली जाते त्याप्रमाणे हा सोहळा संपन्न झाला. तिनही दिवसांच्या कार्यक्रमांसाठी मोजकेच पुजारी नेमण्यात आले आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत .