केवळ भूमिपूजन नव्हे, ही रामराज्याची सुरुवात- योगी आदित्यनाथ

    दिनांक : 05-Aug-2020
Total Views |
 
अयोध्या : आज केवळ राममंदिर उभारणीचे भूमिपूजन झालेले नाही, हा कार्यक्रम फक्त मंदिर उभारणीचा नाही. या माध्यमातून रामराज्याची सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज बुधवारी राममंदिर भूमिपूजन सोहळ्यात केले.
 
 
Yogi_1  H x W:
 
 
 
आमचा तब्बल पाच शतकांचा संकल्प आज पूर्ण झाला आहे. यासाठी झालेल्या आंदोलनातील आंदोलनकर्ते आज उपस्थित असते तर हा सोहळा अधिक मंगलमय झाला असता. सध्या संपूर्ण जग महामारीच्या सावटाखाली असल्याने हे शक्य झाले नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
 
उत्तरप्रदेशच्या भूमीवर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपस्थित संतांचे त्यांनी यावेळी स्वागत केले. हा आमच्यासाठी भावनात्मक दिवस आहे. आजच्याच दिवसापासून देशात एका नवयुगाची सुरुवात होईल. राममंदिर भूमिपूजन ही अत्यंत मोठी संधी आहे.