पंतप्रधान नरेंद्र मोदी - राम मंदिराच्या भूमिपूजनास सुरुवात

    दिनांक : 05-Aug-2020
Total Views |
 
 
मुंबई - अयोध्येमध्ये प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या भूमिपूजनास बुधवार रोजी सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊमध्ये दाखल झाले आहेत. दुपारी 12.40 वाजता रामजन्मभूमी येथे राम मंदिराचा पायाभरणी कार्यक्रमास सुरूवात झाली.
 
MODI _1  H x W:
 
 
यादरम्यान, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक असून या परिसरात जाण्या-येण्यासाठी निमंत्रण पत्रिकेवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आले आहेत. निमंत्रण पत्रिका असल्याशिवाय संबंधितांना भूमिपूजना ठिकाणि प्रवेश दिला जाणार नाही. आज अयोध्यानगरी आणि शहरातील ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेत आहे. या कार्यक्रमास एकूण 175 संत, महंत आणि विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहतील. तसेच हा सोहळा सर्वांना दूरचित्रवाणीवरून थेट प्रेक्षेपण करण्यात येणार आहे. या सोहळ्यास सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथही अयोध्येत उपस्थित आहेत.