'राम' नामाच्या गजरानं अयोध्यानगरी दुमदुमली

    दिनांक : 05-Aug-2020
Total Views |
अयोध्या : अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उभारणीच्या पायाभरणीचा दिवस उजाडला आणि साऱ्या भारत देशामध्ये मंगलमय वलातावरण पाहायला मिळालं.
 

ram_1_1  H x W: 
 
 
अयोध्यानगरीमध्ये तर, गेल्या काही दिवसांपासून कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. हा आनंद शिगेला पोहोचला जेव्हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनासाठी हजेरी लावत एक नवा शुभारंभ केला.
 
 
 
ram_2_1  H x W:
 
सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तप प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर १७५ आमंत्रितांची या सोहळ्याला उपस्थिती पाहायला मिळाली.
 

ram_3_1  H x W: 
 
 
यावेळी भूमिपूजन सोहळ्याची सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधानांनी शुभसूचक अशा पारिजातकाच्या रोपाचं वृक्षारोपणही केलं.
 

ram_4_1  H x W: 
मंत्रोच्चारांच्या पवित्र स्वरांमध्ये या सुवर्ण क्षणाचं साक्षीदार साऱ्या देशाला होता आलं. अतिशय मनोभावे पंतप्रधानांनी यावेळी दृढ संकल्प करत राम मंदिराची वीट ठेवत एका नव्या पर्वाची सुरुवात केली.
 

ram_5_1  H x W: