वाघळीत कोरोना योध्यांचा गौरव

    दिनांक : 31-Aug-2020
Total Views |

waghali_1  H x
वाघळी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते सूर्यवंशी यांचा उपक्रम
वाघळी ता.चाळीसगाव : तालुक्यातील वाघळी येथे डॉ.सचिन देशमुख यांच्यासह आशा सेविका यांना कोरोना योध्दा म्हणून ३१ रोजी गौरविण्यात आले. माजी जि.प.शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे यांच्या हस्ते डॉ.सचिन देशमुख यांना सन्मानित करण्यात आले.वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षदा पाटील यांचा सत्कार अविनाश सुर्यवंशी यांनी तर आरोग्य विस्तार अधिकारी सोनवणे यांचा सन्मान अभय सोनवणे यांनी केला.
 
वाघळी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सुर्यवंशी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. कोरोना काळात गावातील महत्वुपर्ण माहिती जमा करणार्‍या आशा सेविका यांच्याही कार्यांचा सन्मान म्हणून त्यांना कोराना योध्दा म्हणून गौरविण्यात आले. त्यात शितल पगारे, दिपाली केवट, सुनंदा हाडपे, सुवर्णा पाटील, ज्योती माळी, सुनंदा केवट, सुरेखा शेळके, उर्मिला कुमावत आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच कोतवाल महीरे, शिपाई सुभाषचंद्र सोनवणे यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील जयश्री बर्‍हाटे, सरपंच विकास चौधरी, उपसरपंच राजू हाडपे, समाधान महिरे, भास्कर बेडिस्कर, सोनू पहेलवान, रवि पाटील, धनंजय सुर्यवंशी, ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
डॉ.सचिन देशमुख यांचे कौतुकास्पद कार्य
वाघळी येथील खासगी हॉस्पीटलचे डॉ.सचिन देशमुख यांनी कोरोना काळात आपले हॉस्पीटल रुग्णांच्या सेवेसाठी अविरत खुले ठेवून रुग्ण सेवा दिली. तसेच रुग्णांना वेळोवेळी आजाराबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती केली. कोविडची लक्षणे असतील तर रुग्णांना त्वरीत स्वॅब तपासणी करून उपचार घेण्याबाबत त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांच्या सेवा कार्यांची दखल म्हणून त्यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.