‘पीएफ’मधील वजावट पूर्ववत

    दिनांक : 03-Aug-2020
Total Views |
 
 
आता पुन्हा 12 टक्क्यांची होणार कपात
 
 
नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात भविष्य निर्वाह निधीतील वजावट 10 टक्के करण्यात आली होती, पण आता मोकळीकच्या तिसर्‍या टप्प्यात बहुतांश उद्योग आणि व्यवसाय सुरू झाले असल्याने, ही वजावट पूर्ववत 12 टक्के इतकी करण्यात आली आहे. यामुळे कर्मचार्‍यांच्या हातात येणारे वेतन कमी होणार असले, तरी त्यांच्या भविष्यातील पुंजीत वाढ होणार आहे.
 
 
 
epfo_1  H x W:
 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन्‌ यांनी याबाबतची माहिती दिली. मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांमध्ये कर्मचार्‍यांच्या वेतनातून फक्त 10 टक्के पीएफ कापला जायचा. उद्योगांचे योगदानही तितकेच असायचे. मात्र, 1 ऑगस्टपासून मिळणार्‍या वेतनातून पीएफची वजावट पूर्ववत करण्यात आली आहे.
 
 
कर्मचारी व उद्योग यांचे पीएफमधील योगदान कमी करण्याची घोषणा सीतारामन्‌ यांनी मे महिन्यात केली होती. या घोषणेचा लाभ 72 लाख 22 हजार कर्मचार्‍यांना लाभ मिळाला. तर 3 लाख 67 हजार उद्योगांनाही दिलासा मिळाला होता.
 
 
गेल्या महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मंजुरी दिली होती. कर्मचार्‍यांच्या हितासाठी देखील पुढील तीन महिन्यांसाठी 24 टक्के कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योगदान देण्यात आले होते. ज्या उद्योगांमध्ये 90 टक्के कर्मचारी 15 हजारांपेक्षा कमी पगार घेतात, त्यांचा पीएफ सरकारने भरला आहे.