शिरपूरला ८ लाखांचा सुका गांजा जप्त

    दिनांक : 29-Aug-2020
Total Views |
 
shirpur _1  H x
 
शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस स्टेशनची कारवाई
तभा वृत्तसेवा
शिरपूर, २९ ऑगस्ट
शिरपुर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि अभिषेक पाटील हे पोलीस स्टेशनला हजर असतांना त्यांना मिळालेल्या माहितीव्दारे तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे ८ लाखाचा गांजा जप्त करण्यात आला.
शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गांवात इसम नामे चंदनसिंग रामश्या पावरा याने त्याच्या राहत्या घरात अंमली पदार्थ सदृश्य गांजा चोरटी विक्री करण्याच्या उद्देश्याने ठेवला असल्याची बातमी मिळाल्याने सपोनि पाटील यांनी पासई दिपक वारे, पोसई नरेंद्र खैरनार, पो.ना.पवन गवळी, पो.ना. संजीव जाधव, पो.ना. प्रविण धनगर, पो.कॉ. आरीफ पठाण, पो.कॉं.संदीप शिंदे, पो.कॉ.सिध्दांत मोरे, म.पो.कॉ.ज्योती गवळे यांचे पथक स्थापन करुन पथकासह स्वत: अभिषेक पाटील हे रवाना झाले. लाकड्या हनुमान गावी जाऊन चंदनसिंग रामश्या पावरा यांचे घरी जाऊन घरावर छापा टाकला असता त्याठिकाणी घरातील धान्य साठवूण ठेवण्याच्या कोठयांमध्ये सुकवलेला गांजा व गांजाची लागवडीसाठी आवश्यक बीयांचा साठा मिळून आला.
टाकलेल्या छाप्यात सुकवलेला गांजा ७, लाख १५ हजार रुपये किंमतीचा १४३ किलो व एक लाख रुपये किंमतीचे १० किलो गांजा लागवडीसाठीचा बियाणे असा एकूण ८ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणात चंदनसिंग रामश्या पावरा रा.लाकड्या हनुमान ता.शिरपूर याचा शोध घेतलाा असता, आरोपी हा पोलीस येण्याची चाहूल लागताच फारार झाला. त्याचा शोध घेणे सुरु आहे. आरोपीविरुध्द पोसई दिपक वारे यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन एनडीपीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार करीत आहेत. कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधिक्षक धुळे राजु भुजबळ व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर उपविभाग अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.अभिषेक पाटील, पोसई पोसई नरेंद्र खैरनार, पोसई दिपक वारे, पो.ना.पवन गवळी, पो.न. संजीव जाधव, पो.ना.प्रविण धनगर, पो.कॉ. आरीफ पठाण, पो.कॉं.संदीप शिंदे, पो.कॉं. सिध्दांत मोरे, पो.कॉ ज्योती गवळे यांनी केली आहे.