वाकडी येथील अवैध दारू विक्रेत्यांना अटक

    दिनांक : 29-Aug-2020
Total Views |

pahur _1  H x W
 
 
पहूर पोलिसांची कारवाई, ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त
पहूर ता. जामनेर : पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या वाकडी गावात देशी व गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानूसार पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी सोबत रेड पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे पोलीस शिपाई ईश्वर देशमुख ,जितू परदेशी , होमगार्ड जगदीश चौधरी यांनी वाकडी गावच्या शिवारात धरणाचे काठी विनोद सुंदर लाल जोशी हा अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असता याठिकाणी धाड टाकून पाच टाक्या कच्चे रसायन अंदाजे किंमत ११ हजार ५०० रू. जागीच नष्ट केले.
 
तसेच वाकडी गावातील रहिवासी राजू रमेश कोरडे हा त्यांच्या घराच्या बाजूला देशी दारूची चोरटी विक्री करीत असताना याठिकाणी छापा टाकला असता १४ बॉक्समध्ये २९ हजार ९५२ रुपये किमतीचा देशी दारू मुद्देमाल जागीच जप्त करण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील कारवाई पहूर पोलीस करीत आहेत .