जळगावच्या तरूणांनी बनविले ‘द बार्बर्स एक्स्प्रेस’ऍप

    दिनांक : 29-Aug-2020
Total Views |
सलून, ब्युटी पार्लर, स्पा आदी सेवांसाठी होणार ऑनलाईन अपॉईंटमेंट
 

the_1  H x W: 0 

जळगाव : कोरोनाच्या काळात अनेक व्यवसाय ४ महिन्यांपासून बंद होते. या काळात अडचणीत आलेल्या सेवा क्षेत्रातील उद्योगांना ई-कॉमर्सचा आधार मिळत आहे. या पार्श्वभूमिवर शहरातील काही तरूणांनी ‘द बार्बर्स एक्स्प्रेस’ या नावाचे ऑनलाईन सलून अपॉईंटमेंट बुकींग ऍप आणि वेबसाईट विकसीत केली. याद्वारे सलून, ब्युटी पार्लर, स्पा, बॉडी मसाज, टॅटु यासारख्या सेवा देणार्‍यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करून ग्राहकाला वेळेचा अपव्यव टाळण्याच्या दृष्टिने निश्चित वेळ उपलब्ध होईल. तसेच ग्राहक घरबसल्या मोबाईल ऍपच्या मदतीने ऑनलाईन अपॉईंटमेंट त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार बुक करू शकणार आहेत.
 
कोरोनाच्या काळात सुरूवातील जवळपास तीन महिने सलुन, ब्युटी पार्लर, स्पा, बॉडी मसाज, टॅटु हे व्यवसाय बंद होते. त्या व्यवसायांवर अवलंबून असणारे अनेक लोक, व्यावसायीक आणि या व्यवसायांमध्ये काम करणारे कारागीर हे बेरोजगार झाले. मात्र या सेवा क्षेत्राला हातभार लावण्यासाठी आणि त्यातून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करण्याची तयारी प्रमोद चौधरी, स्वप्निल भावसार, विलास क्षिरसागर, प्रतिक कुलकर्णी, प्रतिक पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे. त्यांनी दोन ऍप व एक वेबसाईटची निर्मीती केली असून त्यातूनच या लोकांना एकत्र आणले जाणार आहे. यामुळे अनेक बेरोजगार कारागीरांना पुन्हा काम मिळणार आहे.
 
२०० अधिक नोंदणी
ऍप आणि वेबसाईटवर राज्यातील २०० हून अधिक दुकानदारांनी नोंदणी केली असून नोंदणीप्रक्रिया सुरु आहे. लवकरच या ऍपवर लाभ नागरिकांना घेता येणार आहे. या ऍपमूळे दुकानदारांना त्यांचे दुकान डिजीटल करुन त्यांच्या परिसरापुरते मर्यादित न ठेवता जास्तीत जास्त ग्राहकांपर्यत पोहोचण्यास मदत होईल. ग्राहकांची अपॉइंटमेंट ऑनलाइन पध्दतीने हाताळता येवून त्याचे स्टेटमेंट त्यांना ऑनलाइन पाहताही येणार आहे.
 
होणार रोजगार निर्मिती
या ऍपमुळे अनेकांसाठी नवे रोजगार उपलब्ध होतील. आतापर्यंत या ऍपवर महाराष्ट्रातील भरपूर जिल्हयांमधून व्यावसायिक व कारागीर जुळत असल्यामुळे त्यातून त्यांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, टॅटू व्यावसायिक व बेरोजगार कारागीरांकडून त्यांचे दुकान/व्यवसाय डिजिटल झाल्यामुळे या ऍपला जोरदार पसंती मिळत असल्याने पुढे हे प सदर कंपनी देशभरातील वेगवेगळया शहरात ही व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
 
असे आहे निःशुल्क ऍपचे स्वरूप
‘द बार्बर्स एक्स्प्रेस’ या नावाने दोन ऍप व एक वेबसाईट असून एक ऍप हे सलून, स्पा, ब्युटी पार्लर व टॅटू व्यावसायिक यांच्यासाठी असणार आहे. या ऍपवर त्यांना या मोफत नोंदणी करता येणार आहे. तसेच ग्राहकांसाठी लवकरच दुसरे ऍप उपलब्ध करुन दिले जाणार असून या ऍपसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ग्राहक कोठेही केव्हापण ऍपव्दारे त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार सलुनमध्ये रांग न लावता अपॉईंटमेंट बुक करू शकतील. तसेच त्यांना या ऍपवर काही प्रोडक्ट्ससुध्दा बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे.