बालिकेच्या स्मृत्यर्थ तिच्या वाढदिवशी शहरात मुलांना खाऊचे वाटप

    दिनांक : 29-Aug-2020
Total Views |

enjal_1  H x W:
 
 
जळगाव : बालिकेच्या स्मृतीप्रित्यर्थ तिच्या वाढदिवशी वडिलांनी मेहरूण तलाव येथील गरीब वस्तीमध्ये सुमारे ५० ते ६० मुलामुलींना द एंजेल फूड फाउंडेशनच्या मदतीने केक, मिठाई, चॉकलेट, नानखटाई, बिस्कीट खाऊचे वाटप केले. यावेळी द एंजेल फूड फाउंडेशनचे अध्यक्ष दानियल अलाउद्दीन यांच्यासह सहकारी उपस्थित होते.
 
स्व.साजिया खान हिच्या वडिलांनी द एंजेल फूड फाउंडेशनच्या सहकार्‍यांशी संपर्क साधून मुलीचा वाढदिवसानिमित्त चांगला उपक्रम राबवायचा असे विचारले. त्यावर द एंजेल फूडच्या सहकार्‍यांनी त्यांनी गोरगरीब लहान मुलांना आवडत्या खाद्य पदार्थ वाटप करण्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच यापुढेही माझ्या मृत मुलीचा वाढदिवस अशाप्रकारे साजरा करेल, असे वडिलांनी सांगून समाजापुढे एक नवीन आर्दश निर्माण केला आहे.