सोमवारी दोन दिवस वगळून सर्व दुकाने उघडणार

    दिनांक : 28-Aug-2020
Total Views |
सम-विषम नियमसुद्धा रद्द, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांचे आदेश
 
 
sdfs_1  H x W:
 
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने काढले होते. आता ४ ऑगस्टपासून शहरातील ठरवून दिलेल्या नियमानुसार सोमवारपासून दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच सम-विषम नियमसुद्धा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता आठवड्यातून शनिवार व रविवारी वगळून इतर सर्व दिवशी दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी दिली आहे.
 
राज्यातील विविध व्यवसाय, व्यापारी, संकुले व दुकाने टप्प्याटप्याने उघडे करण्यात येत आहे. ४ ऑगस्टपासून शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार दुकानदारांना व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. आता तो आदेश शिथील करीत आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी शहरातील संपुर्ण दुकाने बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार या वेळेत दुकानदाराने दुकानावर शासकिय नियमांचे पालन करणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे, सॅनिटायझर ठेवणे आदी बंधनकारक ठेवण्याचे आदेश आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी काढले आहे. हे आदेश ३१ ऑगस्टपासून लागू करण्यात येणार आहे.
 
असे आहे निमय
* कपड्या दुकानात ट्रायल रूम बंद ठेवावे, एक्सचेंज बंद ठेवावे.
* सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याची संपुर्ण जबाबदारी दुकानदारांची राहील. ग्राहकांना फूट मार्केटींग, टोकन सिस्टीम आदींचा अवलंब करावा.
* दुकानात एकापेक्षा पाच ग्राहक असू नये.
* दुकानातील कर्मचार्‍यांनी मास्क लावणे गरजेचे आहे. ग्राहकाला विनामास्क माल विक्री करू नये,
* नागरिकांनी शक्यतोवर पायी किंवा सायकलवर खरेदी करण्यासाठी वापर करावा.
* अत्यावश्यक सेवा वगळता इतर वस्तू घेण्यासाठी दूरच्या मार्केटमध्ये जाण्याची गरज नाही.
 
नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई
महापालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे नागरिक व दुकानदारांनी काटेकोरपणे पालन करावे, नियमांचे भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी दिला आहे.