सरकारी कामात अडथळ्याप्रकरणी आरोपीस शिक्षा

    दिनांक : 28-Aug-2020
Total Views |
मनपा अतिकमण विभागातील कर्मचार्‍याला केली होती मारहाण
 
cirme_1  H x W:
 
 
जळगाव : मनपाच्या अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यास मारहाण करुन सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी होनाजी हेमराज चव्हाण (३५, रा. २२०, बालाजी पेठ, सराफ बाजार) या आरोपीस शुक्रवारी न्यायालयाने एकूण दोन वर्षे सक्त मजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी आहे.
 
२ नोव्हेंबर, २०१६ रोजी बळीराम पेठ रोडवरील अतिक्रमण करुन भाजीपाला विक्री करणार्‍यांना मनपाच्या अतिक्रमण विभागातील पथकाने रस्त्यावरुन उठविले आणि पुन्हा न बसण्याबाबत इशारा दिला. त्यानंतर फिर्यादी नसरुददीन अजीज भिस्ती हे अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यासह शहरातील जुना कापड दुकान गल्ली, रमेश किराणा दुकाना समोरील अतिकमण काढण्याचे काम करीत होते. त्यावेळी होनाजी चव्हाण याने १५ ते २० भाजीपाला विक्रेत्यांना सोबत घेवून येत फिर्यादीस तुम्हाला भाजीपाला घेण्याचा काय अधिकार आहे. तुम्ही जास्त मातले आहेत, तुम्हाला जिवंत सोडणार नाही, असे बोलुन फिर्यादीच्या शर्टाची कॉलर पकडुन त्याला चापटा, बुक्यांनी मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणला. या कारणावरुन आरोपीविरुध्द शहर पोलीस स्टेशनमध्ये २ नोव्हेंबर, २०१६ रोजी विविध कमलांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने हा खटला येथील दुसरे तदर्थ व सत्र न्यायाधीश सी.व्ही. पाटील यांच्या न्यायालयासमोर चालविण्यात आला.
 
८ साक्षीदार तपासले
दरम्यान, सरकारतर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी नसरुद्दीन अजीत भिस्ती, हाफिजउल्ला खान, अतिक्रमण विभागचे अधीक्षक, वैभव धर्माधिकारी, शांताराम सोनवणे, डॉ.अतुल पाटील आणि गुन्ह्याचे तपासाधिकारी सहा.फौजदार के.जी.शेख यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मोहन दि.देशपांडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पुराव्याअंती मे.न्यायालयाने आरोपी होनाजी चव्हाण यास भादंवि कलम ३५३ अन्वये दोषी धरुन १ वर्ष सक्तमजुरी व ५०० रु.दंड आणि भादंवि कलम ३३२ अन्वये दोषी धरुन १ वर्ष सक्त मजुरी व ५०० रु.दंड अशी न्यायाधीश सी.व्ही. पाटील यांनी सुनावली.
 
चांगल्या वर्तवणुकीचा बंधपत्र देवून मुक्त
या खटल्यात आरोपीचे वय बघता तसेच यापूर्वी त्याला कोणत्याही गुन्ह्यात शिक्षा झालेली नसल्यामुळे न्यायालयाने त्यास प्रोबेशन ऑफ ऑफेन्डर ऍक्टचे कलमाअंतर्गत दिलेल्या शिक्षेच्या कालावधीमध्ये कोणताही गुन्हा केल्यास त्याला दिलेली शिक्षा भोगावी लागेल म्हणजे चांगल्या वर्तवणुकीचा बंधपत्र देवून त्यास न्यायालयाने मुक्त केले आहे. याकामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मोहन दि.देशपांडे यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी गणेशकुमार नायकर यांनी मदत केली.