जिल्ह्यात वाढले विक्रमी ८५८ कोरोना रुग्ण

    दिनांक : 26-Aug-2020
Total Views |
दिवसभरात ५०६ जण कोरोनामुक्त, जामनेरमध्ये विस्फोट
 
 
corona_1  H x W
 
जळगाव : कोरोना संसर्ग दिवसंेंदिवस वाढतच असून बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात विक्रमी ८५८ रुग्णांची नोंद झाली. त्यात जामनेर तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून दिवसभरात तेथे तब्बल २२६ रूग्ण आढळून आलेे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २४ हजार ३८५ वर पोचली आहे. तर उपचारादरम्यान १३ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ५०६ रुग्ण बरे झाले.
 
जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ९४, जळगाव ग्रामीण २९, भुसावळ ८१, अमळनेर १, चोपडा ४९, पाचोरा २५, भडगाव २४, धरणगाव ४०, यावल १९, एरंडोल ९९, जामनेर २२६, रावेर २०, पारोळा ५४, चाळीसगाव ६४, मुक्ताईनगर २३, बोदवड ८ आणि इतर जिल्ह्यातील २ जणांचा समावेश आहे.
 
जिल्ह्यात बुधवारी १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील चार, चोपडा व रावेर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर जामनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ७६५ झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या ६ हजार ५१५ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चव्हाण यांनी दिली.