तरुण भारत कार्यालयात श्रीगणेशाचे आगमन...

    दिनांक : 22-Aug-2020
Total Views |

sfd_1  H x W: 0 
 
जळगाव : दरवर्षाप्रमाणे यंदाही ‘तरुण भारत’ कार्यालयात भक्तीमय वातावरण पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्रीगणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. प्रारंभी माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संचालक सचिन आणि मिनल बोरसे यांच्याहस्ते गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शासनाच्या नियमांनुसार सोशल डिस्टन्सिंग पाळत मोजक्या सहकार्‍यांच्या उपस्थितीत गणरायाचे आगमन झाले. विघ्नहर्ता श्री गणरायाने कोरोनाचे विघ्न लवकर घालवावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. याप्रसंगी ‘तरुण भारत’कार्यालयातील सर्व सहकारी उपस्थित होते.