जिल्ह्यात आढळले ६१६ नवीन कोरोनाबाधित

22 Aug 2020 20:37:29
जळगावात १०१ रुग्णांची भर, ४०२ झाले कोरोनामुक्त
 
corona_1  H x W
 
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून शनिवारी ६१६ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या २१ हजार ७१३ झाली आहे. सर्वाधिक १०१ कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात ५ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात ४०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यात शनिवारी नव्याने ६१६ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली. नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर १०१, जळगाव ग्रामीण ३४, भुसावळ ३०, अमळनेर ४२, चोपडा ८६, पाचोरा ३६, भडगाव ३९, धरणगाव २८, यावल १४, एरंडोल ९, जामनेर ३६, रावेर ३०, पारोळा ५२, चाळीसगाव ६५, मुक्ताईनगर १, बोदवड ११, इतर जिल्ह्यातील २ अशी रूग्ण संख्या आहे.
 
दिवसभरात ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहर २ तर चोपडा, बोदवड आणि रावेर तालुक्यातील प्रत्येकी १ याप्रमाणे बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0