कोरोना कहर : एकाच दिवशी आढळले ८७० कोरोनाबाधित

21 Aug 2020 20:32:07
शहरातील २२२ जणांचा समावेश, ५६६ रुग्ण कोरोनामुक्त, १३ जणांचा मृत्यू
corona_1  H x W
 
जळगाव : जिल्ह्यात गुरुवारी तब्बल ८७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत सर्वांत अधिक हा आकडा आहे. तसेच जळगाव शहरातसुद्धा विक्रमी रुग्ण वाढ झाली असून दिवशभरात तब्बल २२२ बाधित रुग्ण आढळून आले आहे. तसेच दिवसभरात ५६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा २१ हजार ९७ झाला आहे. तर उपाचारादरम्यान १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून शुक्रवारी आढळलेल्या बाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक २२२ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. जिल्हा आणि मनपा प्रशासनातर्फे शहरात हॉकर्स आणि किरकोळ व्यापार्‍यांची अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित संख्या वाढत आहे. या तपासणीमुळे निदान झालेल्या कोरोनाबाधितांचे विलकीकरण करण्यात येत असून अँटिजेन टेस्टींगवर अधिक भर दिला जात आहे.
 
नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर २२२, जळगाव ग्रामीण ७४, भुसावळ १०, अमळनेर ४४, चोपडा ८४, पाचोरा १४, भडगाव ४०, धरणगाव ७१, यावल २५, एरंडोल ५३, जामनेर ३७, रावेर ८६, पारोळा ३७, चाळीसगाव ६५, मुक्ताईनगर ३, बोदवड ५ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात १३ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहर ४, अमळनेर, पाचोरा तालुक्यात प्रत्येकी २ तर चोपडा, धरणगाव, चाळीसगाव, जामनेर, भडगाव तालुक्यात प्रत्येकी एका बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सी.एन.चव्हाण यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0