पालकमंत्र्यांकडून केमिस्ट असो.चे जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांचे अभिनंदन

    दिनांक : 20-Aug-2020
Total Views |

sunil bhangale_1 &nb
 
जळगाव : जिल्हयात कोरोनाचा प्रभाव वाढत असून या कठीण परिस्थितीमध्ये केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी जीवाची पर्वा न करता औषधांची गरज असणार्‍या सर्वच रुग्णांची काळजी घेतली. तसेच अन्य आजारांना लागणार्‍या औषधी आणि इंजेक्शनचा पुरवठा केल्यामुळे अनेकांचा जीव वाचला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पत्र देवून त्यांचे अभिनंदन केले.
 
कोविड १९ यावर उपयुक्त असे इंजेक्शन गरजूंना बाहेर मिळत नव्हते. याची दखल घेत सुनील भंगाळे यांनी संघटनेच्या माध्यमातून केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करुन संबंधित औषधी व इंजेक्शन जळगाव जिल्हयातील सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करुन दिले. त्यामुळे जिल्हयातील अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. जिल्हयातील कोरोनाबाधित रुग्णास औषध व इंजेक्शनची गरज केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न भंगाळे यांनी केला आहे. त्याबद्दल जिल्हयातील केमिस्ट बांधवांनी सेवा दिल्याबद्दल सर्व योध्यांचे पालकमंत्र्यांनी पत्राद्वारे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे केमिस्ट असो.चे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांचेसुद्धा पालकमंत्र्यांनी वैयक्तिक अभिनंदन केले असून आपल्या हातून यापुढेही कोरोनाबाधितांची सेवा होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
 
आपल्या हातून होणार्‍या या कार्यात सर्व केमिस्ट बंधूंनी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, असेही पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.