गृहमंत्री अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह

    दिनांक : 02-Aug-2020
Total Views |
 
 
नवी दिल्ली :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वत: ही माहिती ट्विटकरून दिली आहे.
 
 
Amit_Shah_1  H
 
 
अमित शहा यांना कोरोनाची प्राथमिक लक्षने दिसल्या नंतर त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली, त्याचा अहवाल सकारात्मक आला. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
 
‘माझी प्रकृती ठिक असून, मला डॉक्टरांनी रुग्णालयात भरती होण्यास सांगितले आहे.ङ्क तरी मागील काही दिवसांमध्ये माझा संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला आयसोलेट करून कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी ट्विटमध्ये केले आहे.