एका दिवसात ३६२ जण कोरोनामुक्त

02 Aug 2020 20:12:41
जिल्ह्यात ३६५ नवीन रुग्णांची भर, १३ जणांचा मृत्यू

Corona_1  H x W 
 
जळगाव, २ ऑगस्ट
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. जिल्ह्यात रविवारी तब्बल ३६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ३६५ बाधित रुग्ण आढळून आले आहे. नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये ९२ जण जळगाव शहरातील आहेत. तर १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
जिल्ह्यात नवीन आढळलेले रुग्ण
जिल्ह्यात ३६५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक ९२ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल चोपडा ४५, चाळीसगाव ३४, जळगाव ग्रामीण २९, भुसावळ २८, अमळनेर २९, पाचोरा ३०, भडगाव १५, धरणगाव व यावल प्रत्येकी ७, एरंडोल ४, जामनेर १५, रावेर १५, पारोळा ८, बोदवड ५, अन्य जिल्हा १ असे एकूण ३६५ रूग्ण आढळून आले आहे.
 
एकूण तालुकानिहाय रूग्णसंख्या
जळगाव शहर ३००२, जळगाव ग्रामीण ५७९, भुसावळ ९३१, अमळनेर ७६६, चोपडा ८३२, पाचोरा ४४८, भडगाव ४५७, धरणगाव ५२५, यावल ४७१, एरंडोल ५०७, जामनेर ८३०, रावेर ७११, पारोळा ४८९, चाळीसगाव ५६३, मुक्ताईनगर ३४९, बोदवड २४९, इतर जिल्हे ४४ असे एकूण ११ हजार ७५३ रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ८ हजार २०३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. बाधितांपैकी ३ हजार १० रूग्ण उपचार घेत असून आजपर्यंत ५४० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
Powered By Sangraha 9.0