वाघळी ग्रामपंचायतीला आय.एस.ओ. मानांकन

    दिनांक : 19-Aug-2020
Total Views |
 
 
वाघळी, ता.चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाने जलसंधारण, शुद्ध पाणी, वृक्ष लागवड, ग्रामपंचायतीचे आताचे दफ्तर, गावाचे रस्ते, अंगणवाडी, शैक्षणिक सेवा सुविधा, पाणी पुरवठा, आरोग्य अशा विविध क्षेत्रात सर्व पायाभूत सुविधा ग्रामपंचायतीने निर्माण करून दिल्यानंतर आय.एस.ओ. नामांकनासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न केले. या नामांकनासाठी संबंधित संस्थेच्या चमूने सर्वेक्षण केले.त्यानंतर जळगाव जिल्ह्यात वाघळी ग्रामपंचायतीला आय.एस.ओ. नामांकन जाहीर करण्यात आले.
 
 
 
Waghali_ISO_1  
 
 
जळगावचे आमदार व वाघळी गावाचे सुपूत्र सुरेश भोळे यांच्या हस्ते आय.एस.ओ नामांकनाचे पत्र देवून सन्मानित करण्यात आले. यामुळे वाघळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आय.एस.ओ मानांकनाचे प्रमाणपत्र स्वीकारते वेळी भा.ज.पा. जळगाव महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अविनाश सूर्यवंशी, प्रभाकर सोनवणे, गणेश माळी, ग्रा.पं. सदस्य भास्कर बेडीस्कर, समाधान महिरे, विजय भंगाळे, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र लोणीया, पोलीस पाटील जयश्री बर्‍हाटे, गिरीश बर्‍हाटे, निलेश सोनगीरे, ज्ञानेश्वर शिंदे, धनंजय सूर्यवंशी, जगदिश कुमावत आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन संदीप आहिरे यांनी केले.
 
 
 
ग्रापंचायत स्तरावर विविध शासन योजना व लोकोपयोगी उपक्रम राबवून गावाने सर्ंवागीण दुष्ट्या विकास साधला आहे लोकसहभाग देखील वाखाणण्याजोगा राहिला असे आ. सुरेश भोळे यांनी सांगितले. गावाच्या परिवर्तनात .खा. उन्मेष पाटील , आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, जि. प. सदस्य पोपट तात्या भोळे. यांनी मोलाची साथ व मार्गदर्शन मिळाले आहे. वाघळी ग्रामपंचायत नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा देण्याच्या दुष्ट्रीकोनातून शासनाच्या योजना योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जात आहे. गावाच्या प्रगतशील वाटचालीत महत्त्वपुर्ण असा लोकसहभाग लाभत आहे . लोकसहभाग ,ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या मेहनीतीचे हे फलीत आहे. आय.एस.ओ मानांकन प्राप्त झाल्याने गावाचा सन्मान झाला असून हा सन्मान टिकवून ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशिल राहणार असा विश्वास सरपंच विकास चौधरी यांनी व्यक्त केला.