माजी क्रिकेटपटू, क्यूरेटर गोपालस्वामी कस्तुरीरंगन कालवश

    दिनांक : 19-Aug-2020
Total Views |

kasturi_1  H x
नवी दिल्ली
ज्येष्ठ क्रिकेटपटू गोपालस्वामी कस्तुरीरंगन (89) यांचे बुधवारी येथील निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. कस्तुरीरंगन हे माजी क्रिकेटपटू, प्रशासक आणि बीसीसीआय क्यूरेटर होते. 1948 ते 1963 या काळात डावखुरा मध्यमगती गोलंदाज म्हणून त्यांनी बहुधा रणजी ट्रॉफीमध्ये म्हैसूरसाठी खेळले होते
 
अशी माहिती बोर्डाच्या सूत्रांनी दिली. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत प्रख्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू अनिल कुंबळे यांनी ट्विट केले की, जी कस्तुरीरंगन यांचे निधन झाल्याबद्दल ऐकून वाईट वाटले. क्रिकेटमध्ये केलेल्या सर्व योगदानाबद्दल त्यांची आठवण ठेवली जाईल.
 
कस्तुरीरंगन यांनी खेळानंतर क्यूरेटर म्हणून ख्याती मिळवली. त्यांनी बीसीसीआयच्या ग्राऊंड आणि विकेट्स कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि त्याच्या कलाकुसरातील सर्वोत्कृष्ट म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे (केएससीए) उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. कस्तुरीरंगन यांचा मुलगा के. श्रीरामनेही त्यांच्या पावलांवर पाऊल टाकले आणि आता ते बीसीसीआय क्यूरेटर आहेत.