एकाच दिवशी ३५१ रुग्ण कोरोनामुक्त

    दिनांक : 19-Aug-2020
Total Views |
जिल्ह्यात ६०५ रुग्णांची भर, १० जणांचा मृत्यू
 

corona_1  H x W 
 
जळगाव : जिल्ह्यात गुरुवारी ६०५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून दिवसभरात ३५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या उबंरठ्यावर आला आहे. तर १० जणांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
 
जिल्ह्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ९३ रूग्ण हे चोपडा तालुक्यात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल जळगाव शहर ९० तर जळगाव ग्रामीण ७२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तसेच भुसावळ १८, पाचोरा ९, भडगाव ६१, धरणगाव १७, यावल १०, एरंडोल ८२, जामनेर १७, रावेर ३०, पारोळा ७, चाळीसगाव ६७, मुक्ताईनगर १, बोदवड १२ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ७ असे रूग्ण आढळून आले आहेत.
 
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १९ हजार ६८७ इतकी झालेली आहे. त्यातील १३ हजार ५२७ रूग्ण बरे झाले आहेत. मृतांचा आकडा ६८८ इतका आहे. दरम्यान आता सध्या ५ हजार ४७२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच गुरुवारी जिल्ह्यात १० रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरासह जळगाव, पाचोरा, रावेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर, धरणगाव, भुसावळ, चोपडा व यावल तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सध्या ५ हजार ४७२ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सी.एन.चव्हाण यांनी दिली.