पाचोर्‍यात जारगाव चौफुली नाल्याला पूर

    दिनांक : 17-Aug-2020
Total Views |
 
pachora _1  H x
वाहतूक खोळंबली, संततधार पावसामुळे घरांना पाण्याचा वेढा
पाचोरा : गेल्या दोन तीन दिवसांपासून पाचोरासह तालुक्यात सततधार पावसाची सुरू असून मातीच्या घरांची पडझड सुरू झाली असून पिकांचेही नुकसान होत आहे.
 
पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीजवळील नाल्याला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. तसेच शहरात येण्या जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्याने सकाळपासून या मार्गावर पाणी होते. या नाल्यावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने व पाणी वाहत असल्याने वाहन चालकाना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने सकाळपासून आठ, दहा वाहन चालक वाहत्या पाण्याच्या वेगामुळे पडले.
 
अरुंद रस्ता असल्याने बर्‍याच वेळा वाहनचालक नाल्यात जाऊन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी या परिसरातील युवकांनी वाहनचालक नाल्यात पडू नाहीत म्हणून त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आडोसा लावल्याने वाहन चालक रस्त्यावरून जात होते.परंतु खड्ड्यांमुळे वाहन चालक पडत होते. या परिसरातील घरालाही पाण्याचा वेढा पडला होता. गेल्या वर्षीही या मार्गावर मोठ्या प्रमाणावर नाल्याचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्यावरील मार्गाची उंची वाढवण्याची होत आहे.
रस्त्याची रुंदी वाढवावी अशी मागणी होत आहे. परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासन लक्ष देत नाही. तसेच कृष्णापुरी फरशीची उंची गेल्या अनेक वर्षांपासून वाढवण्याची मागणी होत आहे. परंतु याकडेही लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. हिवरा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले की वाहतूक ठप्प होते. यावर्षी तर वारंवार वाहतूक ठप्प होत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन नेमकी कसली वाट पाहत आहे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.