भाजप युवा मोर्चाच्या चाळीसगाव तालुकाउपाध्यक्षपदी इंजि.आदित्य महाजन

    दिनांक : 17-Aug-2020
Total Views |

chalisgoan _1   
 
चाळीसगाव : इंजी. आदित्य उद्धवराव महाजन बी.ई.(सीव्हील) एम.टेक यांची यांची चाळीसगाव तालुका भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते तालुका युवामोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्तिपत्र त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
तसेच या निवड़ीबद्दल आ. मंगेश चव्हाण, जळगाव शहर महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी व तालुकाध्यक्ष सुनील निकम आदींनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच आदित्य महाजन हे भाजपा प्रदेश कार्यसमिती सदस्य तथा उद्योगपती उद्धवराव महाजन यांचे चिरंजीव आहेत. तसेच आदित्य महाजन हे पं. दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे सचिव असून (अंबाजी) बेलगंगा साखर कारख़ान्याचे संचालक देखील आहेत.