पाचोरा येथे आज पुरवठा शाखेतील कर्मचारी,रेशन दुकानदार कोरोना योद्धांचा होणार गौरव

    दिनांक : 14-Aug-2020
Total Views |

pachora _1  H x
स्वातंत्र्यदिनी आ.किशोर पाटील, प्रांताधिकार्‍यांच्या हस्ते होणार सन्मान
पाचोरा : येथील पुरवठा शाखेतील कर्मचार्‍यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कोरोना योद्धांचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पाचोरा येथील पोलीस कवायत मैदानावर आ. किशोर पाटील व प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांचे हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना नियोजनबद्ध पध्दतीने व वेळेवर अन्नधान्य वाटप केल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केलेल्या कार्याची दखल घेत पाचोरा पुरवठा शाखेतील कर्मचारी अजिंक्य आंधळे, उमेश शिर्के, उमेश पुरी, प्रशांत पगारसह दुकानदार सुरेखा संजय महाले (पाचोरा), विविध कार्यकारी सह सोसायटी (लोहारा),शरद रमेश पाटील (वेरूली) यांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन महसूलदिनी सन्मानित करण्यात आले.
अजिंक्य आंधळे याना येथील प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनीही महसूल दिनी सन्मानित केले होते. . यावेळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.