मनपातील अतिक्रमण, सा.बां.विभागातील २० कर्मचार्‍यांच्या बदल्या

    दिनांक : 14-Aug-2020
Total Views |

mnpa_1  H x W:
 
जळगाव : मनपातील अतिक्रमण आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपीक, नाकेदार, शिपाई आणि मजूर अशा एकूण २० कर्मचार्‍यांच्या गुरुवारी आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी बदल्या केल्या आहे. त्यांना त्वरित आपल्या नव्या जबाबदारीवर रुजू होण्यास बजावण्यात आले आहे.
 
बदल्या करण्यात आलेल्या कर्मचार्‍यात अतिक्रमण विभागातील विजय देशमुख किरकोळ वसुली विभागात, संजय पाटील प्रभाग समिती क्र.१ मध्ये, हरिश सोनवणे प्रभाग समिती क्र.२ मध्ये, संजय परदेशी मलेरिया विभागात, धनराज सोनवणे, शालिक सोनवणे आणि सलमान मिस्तरी हे सा.बां.विभागात, रामसिंग सोनवणे भानुदास ठाकरेंच्या जागी, जगन्नाथ सोनवणे सा.बां.त विलास चौधरींच्या जागी, अर्जुन सोनवणे अग्निशमनमध्ये रमेश शंखपाळ यांच्या जागी तर सुनील कोल्हे आणि साजीद अली आबीद अली यांची मलेरिया विभागात बदली करण्यात आली.
 
तसेच किरकोळ वसुली विभागील संजय ठाकूर अतिक्रमणमध्ये, प्रभाग समिती क्र.२ मधील डिगंबर खाचणे अतिक्रमणविभागात, सा.बां.विभागातील राजू गोंधळी, भरत सोनवणे, राम पवार, भानुदास ठाकरे, विलास चौधरी आणि रमेश शंखपाळ यांची बदली अतिक्रमण विभागात करण्यात आली आहे. या बदल्यांचे आदेश त्वरित लागू होणार असल्याचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी म्हटले आहे.