पाचोरा नगरपरिषदेच्या चतुर्थ श्रेणीकर्मचार्‍यांना गणवेश वाटप

    दिनांक : 13-Aug-2020
Total Views |
 
pachora _1  H x
 
 
कर्मचार्‍यांच्या मागणीची मुख्याधिकारी
शोभा बाविस्कर यांनी घेतली दखल
पाचोरा : येथील नगर परिषद सफाई कर्मचारी यांचे पुर्वी दिलेले गणवेश खराब झाल्याने अनेक दिवसांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांमधून गणेवशाबाबत मागणी होती. त्यावर नगराध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सभेच्या मान्यतेने पाचोरा नगरपरिषदेतर्फे १३ रोजी नगरपरिषदेच्या शिपाई वर्गीय तसेच आरोग्य विभागाकडील सफाई कर्मचार्‍यांना प्रत्येकी २ ड्रेस,टी शर्ट, जॅकेट व महिला सफाई कर्मचा-यांना दोन साड्या,जॅकेट खरेदी करण्यात आले.
 
 
गणवेशाचे वाटप लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, पाणीपुरवठा अभियंता जितेंद्र मोरे, प्रशासन लिपीक ललित सोनार, राजेंद्र शिंपी, किशोर मराठे, आकाश खैरनार, राकेश मिश्रा आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.