सशस्त्र दल दीर्घकालीन लढ्यासाठी सज्ज

12 Aug 2020 20:30:19
जनरल बिपीन रावत यांची संसदीय समितीला माहिती
 
नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणत्याही आगळीकीला तोंड देण्यासाठी तसेच येथे कडाक्याच्या हिवाळ्यासह दीर्घकालीन लढा देण्यासाठी सशस्त्र दल सज्ज आहे, अशी माहिती तीनही दलाचे सेनापती जनरल बिपीन रावत यांनी संसदीय समितीला दिली.
 

General-Bipin-Rawat_1&nbs 
 
 
उंचावर तैनात केलेल्या लष्कराच्या जवानांसाठी उबदार वस्त्र खरेदी करण्याच्या मुद्यावर बिपीन रावत आणि लष्करातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी संसदीय समितीसोबत चर्चा केली. कॉंग्रेस खासदार अधीररंजन चौधरी हे संरक्षण विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत.
 
 
 
लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशांनी सैन्य मागे घ्यावे, यासाठी भारत आणि चीनमध्ये सध्या लष्करी आणि राजनयिक पातळीवर चर्चा सुरू आहे, हे महत्त्वाचे. पीपल्स लिबरेशन आर्मीने गलवान खोरे आणि इतर काही संघर्ष िंबदूंवरून माघार घेतल्याचे वृत्त असले, तरी पँगॉंग सो, गोगरा आणि डेपसांग या िंफगर क्षेत्रातून चिनी लष्कराने अद्याप माघार घेतलेली नाही. यासाठी भारताकडून मागणी केली जात आहे.
 
 
 
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अस्थिर परिस्थिती पाहता, भारतीय लष्कर आणि वायुदलाने पूर्व लडाख, उत्तर सिक्कीम, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशात चिनी आगळीकीला तोंड देण्यासाठी सज्जता ठेवली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अतिदक्षता बाळगून सज्ज राहण्याची सूचना लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी लष्करातील वरिष्ठ कमांडर्सला केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
 
गलवान खोर्‍यात 15 जून रोजी झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमध्ये ंमोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे.
Powered By Sangraha 9.0