देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

    दिनांक : 11-Aug-2020
Total Views |
नवी दिल्ली : मागील पाच दिवसांत आज मंगळवारी प्रथमच नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 53,601 नवे बाधित आढळल्यामुळे देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 23 लाखांच्या जवळ पोहोचली आहे.
 
Corona_1  H x W
 
 
गेल्या 4 दिवसांपासून देशात दररोज 61 हजारपेक्षा जास्त नवे बाधित आढळत होते. आज नव्या बाधितसंख्येत घट होत, ती 53,601 झाली. यामुळे देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 22,68,675 झाली. 871 जणांच्या मृत्युसह देशभरातील बळींची संख्या 45,257 वर पोहोचली आहे. सोमवारी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या हजारावर गेली होती, ती आज कमी झाली.
 
 
 
गेल्या 24 तासात 47,746 जणांसह आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 15 लाख 83 हजार 489 झाली. बरे झालेल्यांचे देशातील प्रमाण 69.80 टक्के आहे. देशातील कोरोनाचा मृत्युदरही 2 टक्क्यापेक्षा खाली म्हणजे 1.99 टक्के झाला आहे. देशातील प्रत्यक्ष कोरोनाबाधितांची संख्या 6,39,929 आहे. हे प्रमाण 28.21 टक्के आहे.