सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्‍या, मास्क न वापरणार्‍यांविरुद्ध पाचोरा न.पा.तर्फे २६ हजार ६०० रु.चा दंड वसूल

    दिनांक : 11-Aug-2020
Total Views |
 
 
यापुढे दंडात्मक धडक कार्यवाही सुरू राहणार : मुख्याधिकारी शोभा बाविस्कर
 
 
पाचोरा : सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्‍या, मास्क न वापरणार्‍यांविरुद्ध मंगळवार ११ रोजी पाचोरा नगरपालिकेतर्फे २६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढे दंडात्मक धडक कार्यवाही अशीच सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगितले.
 
 

Pachora1_1  H x 
 
 
सार्वजनीक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील अधिसुचना कोरोना/२०२०/प्र.क्र.५८/आरोग्य-५ दि.१४/०३/२०२० नूसार जिल्हयात कोव्हीड १९ चा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी जळगांव यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सींगमध्ये दिलेल्या आदेशानुसार तसेच उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाचोरा यांच्या दिलेल्या सुचनेप्रमाणे पाचोरा शहरात वेळोवेळी अनाऊन्सींगद्वारे, जाहीर सुचनेद्वारे तसेच नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी शहरात सूचना देवूनदेखील चेहर्‍यावर मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, गर्दी टाळणे, सार्वजनीक ठिकाणी थुंकणे व इतर तरतूदींचा भंग केल्याप्रकरणी मंगळवार ११ रोजी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी स्वतः रस्त्यावर उतरत नगरपरिषद कर्मचार्‍यांसह धडक दंडात्मक कार्यवाही करत तब्बल २६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच शहरातील काही दुकानांवर मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे या पोटी ६ दुकानदारांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ चे उल्लंघन म्हणून भा.द.वि.कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
 
 
 
Pachora2_1  H x
 
 
सदर धडक मोहीमेचे नेतृत्व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले. पथकामध्ये प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, मधुकर सूर्यवंशी, साईदास जाधव, शाम ढवळे, विजेंद्र निकम, भागवत पाटील, महेंद्र गायकवाड, गजानन पाटील, आकाश खैरनार, किशोर मराठे, भिकन गायकवाड, युवराज जगताप, विलास कुलकर्णी, राकेश फतरोड, वाल्मिक गायकवाड, गोविंद पारोचे, आकाश खेडकर, संजय जगताप, सचिन कंडारे, सरजु बाबु डागोर, किरण ब्राम्हणे, भास्कर पवार, अनिल बागुल संजय वाकडे, सुभाष बागुल, युसुफ पठाण आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
 
 
 
नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास नगरपरिषदेकडून मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल व यापुढे देखील अशीच धडक दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगितले.