न्यावाशेवा बंदरावरून १००० कोटींचे ड्रग्स जप्त

10 Aug 2020 21:51:50
मुंबई : नवी मुंबईच्या न्यावाशेवा बंदरावरून तब्बल १ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सीमा शुल्क विभाग व महसूल गुप्त वार्ता संचालनालयाने (डीआरआय‌) यांनी संयुक्तरित्या ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास १९१ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. प्लास्टिकच्या पाइपमधून हेरॉईन ड्रग्सची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
 
 
drugs_1  H x W:
 
थेट अफगानिस्तान आणि इराणहुन समुद्र मार्गाने हे ड्रग्स मुंबईत आणण्यात आले होते. ड्रग्स माफियांनी कंटरेनमध्ये प्लास्टिकच्या पाईपांमध्ये हेरॉईन ड्रग्स लपवून ठेवले होते. बांबूच्या काठ्यांप्रमाणे त्या प्लॅस्टिकच्या पाईपला रंग मारण्यात आला होता. हे साहित्य आयुर्वेदिक औषध असल्याचे ड्रग्स माफियांनी सांगितले होते. ड्रग्ज इम्पोर्टचे कागदपत्र बनवणाऱ्या दोन कस्टम हाऊस एजंट्सना देखील अटक करण्यात आली आहे. याशिवाय चार इतर इंपोर्टर आणि फायन्सस पुरवणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना आज मुंबईत आणले जाणार आहे.
 
 
 
पोलिसांनी नेरुळ येथील एमबी शिपिंग आणि लॉजिस्टिक सोल्युशनचा कस्टम एजंट मिनानाथ बोडके, मुंब्य्रातून कोंडीभाऊ गुंजाळ या दोघांना अटक केली आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हे सर्वात मोठ ड्रग्ज रॅकेट आहे.
Powered By Sangraha 9.0